मुंबई

All जलवाहतुकीचे तिकीट आता ऑनलाईन

CD

जलवाहतुकीचे तिकीट आता ऑनलाइन

मुंबई, ता. ६ : मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक व एकात्मिक ऑनलाइन तिकीट वितरण आणि विक्री प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
जलवाहतूक सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रवासीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या. या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, तसेच संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच प्रणाली सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे सेवा अधिक परिणामकारकपणे राबविता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
मंत्रालयातील बैठकीत जलवाहतूक सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून प्रवास अधिक सुलभ आणि सोईस्कर करण्यावर भर देण्यात आला. भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय म्हणून जलवाहतुकीचा विकास करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नव्या ऑनलाइन तिकीट सुविधेबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबविण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

SCROLL FOR NEXT