मुंबई

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार

CD

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार
‘जेमिनी’सह गूगल एआय टूल्सवर विशेष कार्यशाळेचे आयोजन

मुंबई, ता. ९ : शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवून डिजिटल रूपांतरणाला गती देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेमिनी आणि गुगल कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांवरील विशेष कार्यशाळेचे शनिवारी (ता. ९) मुंबई विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्‍घाटन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गुगल फॉर एज्युकेशनतर्फे डिजिटल रूपांतरण प्रमुख ईशा पोरवाल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्राधारित शिक्षण तज्ज्ञ श्रीरंग देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शिक्षण आणि प्रशासन अधिक वेगवान, परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्री होणार आहे. गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ डिजिटल रूपांतरणामध्ये अग्रणी भूमिका बजावेल,’ असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले. या कार्यशाळेत जेमिनी, नोटबुक एलएम आणि गुगल वर्कस्पेस कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अत्याधुनिक साधनांचा अध्यापन, संशोधन, मूल्यमापन आणि प्रशासकीय कामकाजात प्रभावी वापर कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. नोटबुक एलएमच्या सहाय्याने अभ्याससामग्रीचे स्वयंचलित सारांश, प्रश्नोत्तरे आणि ध्वनिमुद्रित चर्चासत्र तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच जेमिनी इन क्लासरूमद्वारे विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिकवणी, अभ्यासक्रम नियोजन आणि गुणांकन स्वयंचलन यांसारख्या सुविधांची माहिती देण्यात आली.


‘कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील शिक्षण रचना’ या विषयावर ईशा पोरवाल यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करण्यासाठी आवश्यक महत्त्वपूर्ण टप्पे स्पष्ट केले, तर श्रीरंग देशपांडे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा प्रत्यक्ष वापराची माहिती दिली.

सहभागींना मार्गदर्शन
गुगल डॉक्स आणि शीट्समधील कृत्रिम बुद्धिमत्ता सुविधांमुळे प्रशासकीय अहवाल तयार करणे, माहितीचे विश्लेषण आणि ई-मेल मसुदा तयार करणे अधिक सुलभ होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मूल्यमापनांतर्गत बहुपर्यायी प्रश्ननिर्मिती, उत्तरपत्रिका मूल्यमापन आणि अभिप्राय स्वयंचलन याबाबतही सहभागींना मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात! सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला; सुळेंसह सर्वजण सुरक्षित

Beed Crime: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या घराची झाडाझडती; २०१६ पासूनच्या फाईल्स उघडणार?

'चल, अजून एक विकेट टाकली खिशात...'! जोस बटलरला बाद करताच जाडेजाचा भन्नाट सेलिब्रेशन; ‘इन माय पॉकेट’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा

RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

SCROLL FOR NEXT