दोषी अधिकाऱ्याच्या
निवृत्तिवेतनात कपात
बाबू गेनू इमारत दुर्घटना प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : डॉकयार्ड रोड येथे २७ सप्टेंबर २०१३ रोजी झालेल्या बाबू गेनू इमारत दुघटनेसाठी महापालिकेच्या इमारत परिरक्षण विभागातील अधिकारी विलास सागवेकर दोषी ठरले; मात्र आता ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या निवृत्तिवेतनातून दरमहा ५० टक्के दराने आठ वर्षांसाठी कपात करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी सादर करण्यात आला.
बाबू गेनू इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेस जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई करण्यात आली. तसेच या घटनेस महापालिकेच्या इमारत परिरक्षण विभागातील उपप्रमुख अभियंता विलास सागवेकर यांना जबाबदार धरले होते. सागवेकर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या खात्यांतर्गत सर्वंकष चौकशीअंती दोषारोपातील आरोप सिद्ध झाले. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी त्यांचे मूळ निवृत्तिवेतनातून दरमहा ५० टक्के दराने आठ वर्षांसाठी कपात करण्यात यावी, अशी शिक्षा करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.