जनगणनेच्या कामातून
शिक्षकांना मुक्त करा!
शिवसेना ठाकरे गटाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईतील शाळांत शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान विचारात घेता शिक्षकांना जनगणनेच्या कामातून तातडीने मुक्त करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. शिक्षक हे शिकवण्यासाठी आहेत, जनगणना करण्यासाठी नाहीत, अशा शब्दांत नगरसेवक आणि शिक्षण समिती सदस्य अंकित प्रभू यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
मुंबई महापालिकेने सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी पालिका शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील अध्यापन प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप अंकित प्रभू यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत केला. या वेळी प्रभू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा संदर्भ दिला.
अनेक शिक्षक वयोवृद्ध असून, त्यांना विविध व्याधी आहेत. अशा परिस्थितीत भरउन्हात घरोघरी फिरून माहिती गोळा करणे त्यांच्यासाठी शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरत असल्याचे प्रभू म्हणाले. या मागणीला सदस्या पूजा महाडेश्वर यांनी जाहीर पाठिंबा दिला.
यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी प्रभू यांनी मांडलेला हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला असून, प्रशासन आणि शिक्षण विभागाशी चर्चा करून पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.