मुंबई

आजारी ‘भरत’च्या प्रकृतीत सुधारणा!

CD

आजारी ‘भरत’च्या प्रकृतीत सुधारणा!
तज्ज्ञ पशुवैद्यकांची प्रकृतीवर नजर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ नावाच्या ४.६ वर्षांच्या आशियाई प्रौढ नर सिंहास गंभीर आजाराची लागण झाली होती; मात्र त्याच्यावर वैद्यकीय पथकाने केलेल्या उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.
या सिंहाला २६ जानेवारी २०२५ रोजी सक्करबाग झूलॉजिकल पार्क (गुजरात) येथून शासनमान्य प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत आणण्यात आले होते. आगमनानंतर काही महिन्यांत म्हणजे एप्रिल २०२५ दरम्यान त्याच्या मागील पायांच्या हालचालींमध्ये बदल दिसून येऊ लागला. मे २०२५मध्ये वरिष्ठ तांत्रिक पशुवैद्यकीय समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भूल देऊन एक्स-रे तपासणी केली. या तपासणीत इलिओ-सॅक्रल जंक्शनजवळील जुना फ्रॅक्चर आढळून आला. त्यानंतर तांत्रिक पशुवैद्यकीय समितीतील वरिष्ठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपचार व साहाय्यक व्यवस्थापन सुरू करण्यात आले. उपचारानंतर ‘भरत’च्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसली. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये भरत पुन्हा आजारी असल्याची लक्षणे दिसली. त्यामध्ये भूक मंदावणे व सुस्ती यांचा समावेश होता. विषाणूजन्य तपासणीसाठी विष्ठेचे नमुने संकलित करण्यात आले असता प्रयोगशाळा तपासणीत फेलाइन पॅनल्युकोपेनिया व्हायरस संसर्गाची पुष्टी झाली. सातत्याने उपचार व निरीक्षण सुरू असूनही अपेक्षित सुधारणा दिसली नाही. त्यामुळे भरतला पुन्हा भूल देऊन सविस्तर वैद्यकीय तपासणी तसेच निदानासाठी रक्तनमुने संकलित करण्यात आले. यानंतर तांत्रिक पशुवैद्यकीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली व समितीच्या सूचनांनुसार पुढील उपचार सुरू ठेवण्यात आले.
...
तत्काळ उपचार
उपचारानंतर या सिंहाने आहार घेण्यास सुरुवात केली व त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले; मात्र एप्रिल २०२६च्या अखेरीस डोळ्यांत सूज, भूक मंदावणे तसेच उजव्या बाजूच्या दोन्ही पायांवर काही जखमा आढळून आल्या. त्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुन्हा तपासण्या करण्यात आल्या. नामांकित पशुनेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला. रक्त तपासण्यांमध्ये गंभीर आजाराची शक्यता निदर्शनास आली. त्यामुळे त्यापुढील तपासण्या करून उपचार करण्यात आले.
...
बारीक लक्ष
भरतच्या प्रकृतीवर सतत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्याला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देऊन आवश्यक त्या सर्व निदानात्मक, उपचारात्मक व साहाय्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT