मुंबई

मुंबई महापालिकेचा दुटप्पी कारभार

CD

मुंबई महापालिकेचा दुटप्पी कारभार
नागरिकांना ‘उष्माघाता’चा इशारा, जवानांना भरउन्हात समुद्रावर राबवले!
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : एकीकडे वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे आपल्याच जवानांना भरउन्हात मृत्यूच्या दाढेत ढकलायचे, असा संतापजनक प्रकार मुंबई अग्निशमन दलात सुरू आहे. गिरगाव चौपाटीवर सुरू असलेल्या ‘फ्लड रेस्क्यू ट्रेनिंग’मुळे जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालिका आयुक्तांकडे याविरोधात धाव घेण्यात आली आहे.
​सध्या ​उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. मुंबईचे तापमान ४० अंशांच्या आसपास असताना जवानांना समुद्रात प्रशिक्षणासाठी जुंपले आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये ​मनुष्यबळाचा तुटवडा आहे. त्यातच शहरात आगीच्या घटना वाढत असताना मुख्य अग्निशमन केंद्रांवर तैनात करण्याऐवजी जवानांना प्रशिक्षणात गुंतवणे धोकादायक असल्याचा आरोप होत आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने सध्या अग्निशमन दलाकडून देश किंवा ऑपरेशनचे प्रशिक्षण सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून ब्लड रेस्क्यू ट्रेनिंग सुरू करण्यात आले आहे. पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशनसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जाते. असे असले तरी सकाळच्या सतत किंवा सायंकाळच्या सत्रात हे ट्रेनिंग देता आले असते. मात्र, असे न करता जवानांना भरउन्हाच्या काहिरीमध्ये समुद्रावर प्रशिक्षण घेण्यास भाग पाडण्यात आले आहे.
बीएमसी एससी-एसटी एम्प्लॉईज असोसिएशनने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

प्रशिक्षण तातडीने थांबवा!
संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून हे प्रशिक्षण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. ​स्वतः महापालिका सोशल मीडियावरून उष्माघाताचे धोके सांगते, मग अग्निशमन दलाचे जवान लोखंडी शरीराचे आहेत का, एखाद्याचा जीव गेल्यास प्रशासन जबाबदारी घेणार का, असा संतप्त सवाल डॉ. कांबळे-बापेरकर यांनी उपस्थित केला आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT