मुंबई

साक्षी यांच्या अवयदानातून आठ जणांना जीवनदान

CD

साक्षी यांच्या अवयवदानातून
आठ जणांना जीवनदान

मुंबई, ता. १२ : मुलाच्या दहावीच्या निकालाचा आनंद साजरा होत नाही, तोच चक्कर येऊन पडल्याने मेंदूमृत झालेल्या महिलेच्या अवयवदानातून आठ जणांना जीवनदान मिळाले. साक्षी सोनावणे असे त्या महिलेचे नाव आहे.
साक्षी यांच्या मुलाने दहावीत संस्कृतमध्ये १०० गुण मिळवल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे कार्यालयात असताना त्या एकाएकी चक्कर येऊन पडल्या. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल केले; मात्र दोन दिवसांनंतरही त्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. साक्षी आणि त्यांचे पती शिरीष सोनावणे यांनी तीन वर्षांपूर्वीच अवयवदानाची ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर शिरीष सोनावणे यांनी मुलगा शर्मद आणि मुलगी राज्ञी यांच्याशी चर्चा करून अवयवदानाचा निर्णय घेतला. या वेळी हृदय, यकृत, फुप्फुस, मूत्रपिंड, डोळे आणि ऊती दान करण्यात आले. साक्षीला उपचारातून वाचवता आले नाही; पण अवयवदानातून तरी ती जिवंत राहावी, हीच आमची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया पती शिरीष सोनावणे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात ६ लाखांचे 'MD' ड्रग्ज जप्त

SCROLL FOR NEXT