मुंबईत सीएनजी दरात दोन रुपये वाढ
मुंबई, ता. १४ : महानगर गॅसने मुंबई महानगर विभागात सीएनजीच्या किमती प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढवल्या आहेत. अमेरिका, इस्राईल-इराण युद्ध सुरू झाल्यापासून भारताला कच्च्या तेलाप्रमाणेच नैसर्गिक वायूचा तुटवडा भासतो आहे. अशा स्थितीत नैसर्गिक वायू मिळवण्याची किंमत वाढल्याने प्रामुख्याने ही दरवाढ झाली आहे. त्यासोबत कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, रुपयाचे अवमूल्यन आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे ही भाववाढ करणे भाग आहे, असे महानगर गॅसचे म्हणणे आहे. आता मुंबई महानगर विभागात सीएनजीचा दर प्रतिकिलोमागे ८४ रुपये राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.