मुंबई

पालिकेच्या सहायक आयुक्ताने मालमत्ता विकण्यास भाग पाडले

CD

मालमत्ता विकण्यास भाग पाडले
पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर जाफरी कुटुंबीयांचा आरोप

मुंबई, ता. १५ ः महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी राहता बंगला आणि फ्लॅट विकण्यास भाग पाडत फसव्या प्रकल्पात गुंतवणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांनी केला आहे.

हबीबा यांच्या तक्रारीआधारे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पाटील यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंदवला. याप्रकरणी निशित पटेल या व्यावसायिकास अटक करण्यात आली आहे. तर पाटील आणि अन्य आरोपींचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

हबीबा यांनी गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबानुसार, वांद्रे येथील गृहप्रकल्पात गुंतवणूक करावी, यासाठी पाटील यांनी पिच्छा पुरवला. ते स्वतः सपत्नीक घरी आले. वडील निवृत्त पोलिस अधिकारी असून त्यांनी या गृहप्रकल्पाचा सखोल अभ्यास केला असून तेही गुंतवणुकीस इच्छुक आहेत, असे सांगितले. पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिकांना घेऊन घरी येत. या व्यक्तींकरवी या प्रकल्पातील गुंतवणूक कशी फायदेशीर ठरेल, हे पटवून देत. आपण पालिका अधिकारी असल्याने भविष्यात शहरातील कोणती जागा मोक्याची, फायदेशीर ठरेल, याची विशेष माहिती असते. शिवाय, तोटा होणार नाही, याची जबाबदारी आपली, असे सांगितले. आरोपींनी मुलाचे २० लाख किमतीचे घड्याळ, आपल्याकडे असलेले परकीय चलनही सोडले नाही, असा आरोप हबीबा यांनी केला.

असे फुटले बिंग
पाटील यांनी वांद्रे येथील एका हॉटेल भागीदारीत विकत घेण्याचा प्रस्ताव आणला. वरकरणी तो फायदेशीर वाटत होता; मात्र खरेदी व्यवहारासाठी तयार करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बोगस असल्याची माहिती जाफरी दाम्पत्याला मिळाली. त्यामुळे वांद्रे येथील गृहप्रकल्प हाती घेतलेल्या विकसकाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने पाटील, पटेल यांना ओळखत नसल्याचे सांगितले. या दोघांचा प्रकल्पाशी काहीही संबंध नसून आपल्या नावे येथे कोणतीही गुंतवणूक झालेली नाही, असे या विकसकाने सांगताच जाफरी दाम्पत्यासमोर पाटील, पटेल यांचे बिंग फुटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT