मुंबई

माॅन्सून मुंबईच्या उंबरठ्यावर

CD

माॅन्सून मुंबईच्या उंबरठ्यावर
मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’; पूर्वसरी बरसल्या

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज महाराष्ट्रासह मुंबईच्या उंबरठ्यावर जोमदार आगेकूच केली. भारतीय हवामान विभागाने मॉन्सून अलिबाग, पुणे आणि निझामाबादपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट केले असून, पुढील ४८ तासांत तो मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात पूर्णपणे सक्रिय होईल, असे म्हटले आहे.
बदलत्या हवामानामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, आज सकाळी ६ ते ७ या अवघ्या एका तासाच्या कालावधीत मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या एका तासात मुंबई शहरात सरासरी १७ मिमी, तर पश्चिम उपनगरात १० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, वरळी आणि वांद्रे परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पूर्व उपनगरात मात्र या काळात पावसाची नोंद झाली नाही. सकाळी झालेल्या जोरदार हजेरीनंतर दिवसभर पावसाने काहीशी उघडीप घेतली होती.
​​पश्चिम उपनगरात वांद्रे येथील पाली चिंबाई पालिका शाळा परिसर आणि सुपारी टँक पालिका शाळा परिसरात सर्वाधिक ७० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय वांद्रे अग्निशमन केंद्र परिसरात २८ मिमी, तर जुहू परिसरात २५ मिमी पाऊस पडला. वरळी नाका येथील सावित्रीबाई फुले पालिका शाळेजवळ ६१ मिमी, तर जी-दक्षिण विभाग (वरळी) कार्यालयाजवळ ५८ मिमी पाऊस नोंदवला गेला. तसेच वरळी सीफेस येथे ३७ मिमी, मलबार हिल आणि आदर्श नगर शाळा परिसरात प्रत्येकी ४४ मिमी पावसाची नोंद झाली.
...
किनारपट्टीवर चेतावणी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ ते २६ जून यादरम्यान संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहणार असून, हा वेग ६० किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळित होणे, जुन्या इमारती किंवा झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

Pakistan Water Shortage: पाकच्या हैदराबादमध्ये भीषण पाणीटंचाई; उद्योग क्षेत्र संकटात, उत्पादनावर परिणाम; जनजीवन विस्कळित

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा, SIT च्या तपासात धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT