तोतया सनदी अधिकाऱ्यास अटक
मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचे बनावट पत्र जप्त
मुंबई, ता. २४ ः मुंबई महानगर परिसरात तोतया आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याच्या वेशात अनेकांची फसवणूक करणाऱ्या अल्ताफ शेख नामक तरुणास गुन्हे शाखेने गोरेगाव येथून अटक केली. त्याच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओएसडी म्हणून नियुक्त केल्याचे बोगस पत्र, विविध विभागांचा प्रमुख असल्याचे ओळखपत्र आणि एका स्थानिक वृत्तवाहिनीचा बूम जप्त करण्यात आले.
गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाला एक तोतया दिव्याची गाडी घेऊन फिरतो आणि स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे सांगतो, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे पथकाने शेखची ओळख पटवली आणि त्यास गोरेगाव येथून अटक केली. शेख यास ताब्यात घेतले, तेव्हाही त्याने स्वतः उपायुक्त असल्याचे भासवले आणि पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. शासकीय अधिकाऱ्यांचे सोंग घेत शेख याने अनेकांची फसवणूक केली असावी, असा संशय आहे. त्याबाबत कसून चौकशी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.