‘सिप्ला’चा औषध विक्री परवाना रद्द
मुंबई, ता. २८ : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या वापराला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असलेल्या ‘रिॲक्टिन प्लस’ गोळ्यांच्या पॅकेजिंगवर अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड, वडकी, पुणे या कंपनीचा औषध विक्री व वितरणाचा (सी अँड एफ) परवाना २७ ऑगस्टपासून रद्द करण्यात आला आहे. कंपनीच्या साठवणूक व वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी तसेच औषध बाजारातून परत मागविण्याच्या प्रशासनाच्या निर्देशांचे अपेक्षित पालन न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
एफडीएने जून २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील वडकी येथील कंपनीच्या मुख्य गोदामाची तपासणी केली होती. त्या वेळी ‘रिॲक्टिन प्लस’ या अनुसूची एच औषधाच्या पॅकेजिंगवर ‘वेदनाशामक व तापशामक’ असा परवानगी नसलेला मजकूर छापून त्याचा जाहिरातीच्या स्वरूपात वापर केल्याचे आढळून आले. अनुसूची एचमधील औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच देणे अपेक्षित असताना अशा पद्धतीने औषधाची जाहिरात करणे नियमबाह्य असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एफडीएने सुमारे ११ लाख १९ हजार रुपये किमतीचा ‘रिॲक्टिन प्लस’चा साठा जप्त केला होता. संबंधित औषध चुकीची माहिती असलेल्या जाहिरात स्वरूपातील पॅकेजिंगमुळे ‘दिशाभूल करणारे औषध’ या श्रेणीत येत असल्याने त्याचा बाजारातील साठा परत मागविण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले होते; मात्र या निर्देशांचे अपेक्षित पालन झाले नसल्याचे पुढील तपासणीत आढळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.