पश्चिम रेल्वेचा महसुली विक्रम
दिवाळी आरक्षण; एका दिवसांत ३५.५९ कोटींची कमाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : दिवाळीला अद्याप काही आठवडे बाकी असतानाच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. आरक्षणाच्या पहिल्याच टप्प्यात प्रवाशांकडून तिकिटांना मिळालेल्या मोठ्या मागणीचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या महसुलावर झाला. ६ सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेने एका दिवसात तब्बल ३५.५९ कोटी रुपयांचा महसूल मिळवत आतापर्यंतचा विक्रम नोंदवला. यापूर्वी १८ ऑगस्ट २०२५ रोजी नोंदवलेला ३५.५७ कोटी रुपयांचा उच्चांकही यामुळे मागे पडला.
रेल्वेच्या विक्रमी महसुलात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आरक्षणाचा मोठा वाटा राहिला. ‘पीआरएस’मधून (प्रवासी आरक्षण प्रणाली) २८.३३ कोटी रुपये महसूल मिळाला. याशिवाय यूटीएस नॉन-सबअर्बनमधून पाच कोटी आणि यूटीएस सबअर्बनमधून २.२६ कोटी रुपये जमा झाले. आगाऊ आरक्षण सुरू होताच दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी तिकिटांचे नियोजन सुरू केले. त्यामुळे पीआरएसमधून होणाऱ्या बुकिंगमध्ये वाढ झाली आणि त्याचा थेट फायदा पश्चिम रेल्वेच्या महसुलाला झाला. दिवाळी अद्याप दूर असली तरी आगाऊ आरक्षणाला मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी काळात तिकिटांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागणी वाढली की महसुलाचा आलेखही चढत जाण्याची शक्यता असून, ३५.५९ कोटींचा हा विक्रम पुन्हा मोडला जाऊ शकतो.
दोन लाख रुपयांनी वाढ
१८ ऑगस्ट २०२५ रोजी पश्चिम रेल्वेला एका दिवसात ३५.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यात ‘पीआरएस’मधून २८.१० कोटी, यूटीएस नॉन-सबअर्बनमधून ४.४४ कोटी आणि यूटीएस सबअर्बनमधून ३.०३ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा एकूण महसुलात दोन लाख रुपयांनी वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.