मुंबई

कर्जत-पनवेलचा वळसा संपणार!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : कर्जत आणि पनवेलदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि थेट करण्यासाठी सुरू असलेल्या पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २९.६ किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गिकेचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वेची तयारी सुरू आहे. मात्र, प्रवासीसेवा सुरू करण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) मार्गिकेची तपासणी आणि मंजुरी घेणे आवश्यक आहे.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) हा प्रकल्प उभारला जात आहे. दोन हजार ७८२ कोटींच्या या प्रकल्पामुळे पनवेल-कर्जतदरम्यान पर्यायी उपनगरी रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यातून नवी मुंबई तसेच कर्जत आणि रायगड परिसरातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होण्यास मदत होईल. या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत, अशी पाच स्थानके आहेत. ‘मोहापे’ स्थानकाचे नाव बदलून ‘पोयंजे’ करण्यात आले आहे.

प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापूर्वी उर्वरित तांत्रिक कामे, यंत्रणांच्या चाचण्या आणि सुरक्षा प्रक्रिया पूर्ण करून सीआरएसची मंजुरी मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग पूर्ण
प्रकल्पातील बहुतांश नागरी कामे पूर्ण झाली आहेत. सर्व प्रमुख आणि लहान पूल, पाच रस्ते उड्डाणपूल (आरओबी) आणि १६ रस्ते भुयारी मार्ग (आरयूबी) पूर्ण झाले आहेत. मार्गिकेवरील तीनही बोगद्यांचे खोदकाम आणि अंतिम अस्तरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. पनवेल आणि कर्जतच्या दिशेने असलेले दोन्ही रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाले असून, त्यावर रूळ जोडणीचे काम सुरू आहे. पुणे द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातून रूळ जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे.


३५ ते ४० मिनिटांत पनवेल-कर्जत
लोकल सेवा सुरू झाल्यानंतर पनवेल-कर्जत प्रवासाचा कालावधी सुमारे ३५ ते ४० मिनिटांपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्जत, चौक, पोयंजे, चिखले आणि पनवेल परिसरातील प्रवाशांना थेट रेल्वेजोडणीचा लाभ मिळणार आहे. या मार्गिकेमुळे नवी मुंबई, रायगड आणि परिसरातील वाढत्या नागरी विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


ग्राफिक्स- पनवेल-कर्जत मार्गिका

- लांबी : २९.६ किमी
- मार्ग : दुहेरी
- प्रकल्प खर्च : रु. २,७८२ कोटी
- प्रगती : ९९ टक्के
- स्थानके : पनवेल, चिखले, पोयंजे, चौक, कर्जत
- बोगदे : ३
- बोगद्यांची एकूण लांबी : ३.१६४ किमी
- वावर्ले बोगदा : २.६२५ किमी
- रस्ते उड्डाणपूल : ५
- रस्ते भुयारी मार्ग : १६
- अपेक्षित प्रवास वेळ : ३५ ते ४० मिनिटे
- प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य : डिसेंबर २०२६
- पुढील टप्पा : सीआरएस तपासणी आणि मंजुरी

मुंबई : कर्जत-पनवेलच्या लोकल मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT