मुंबई

खवळलेल्या समुद्रात हायस्पीड बोट बुडाली

CD

खवळलेल्या समुद्रात
हायस्पीड बोट बुडाली
नांगरण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गेटवे ऑफ इंडिया परिसरात नांगरून ठेवलेली हायस्पीड बोट बुधवारी सकाळी समुद्रात बुडाल्याने जलवाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती सागरी महामंडळाने दिली; मात्र समुद्र खवळलेला असताना बोट नांगरण्यासाठी कोणते निकष लागू होते, संबंधित बोट अशा परिस्थितीत समुद्रात उभी करण्यास सक्षम होती का, असे सवाल उपस्थित होत आहेत.
प्रामुख्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हायस्पीड बोट चालविण्यास परवानगी दिली जाते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी वाहतुकीसाठी संबंधित बोट गेटवे ऑफ इंडिया परिसरात आणण्यात आली होती. विशेष म्हणजे जेट्टी क्रमांक ५ बंद असतानाही तिथे ही बोट नांगरण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी खवळलेल्या समुद्रामुळे बोटीत पाणी शिरले आणि ती बुडाली. काही दिवसांपूर्वी गेटवे परिसरातील ‘अनवारी’ फेरीबोटीमध्ये समुद्रात तांत्रिक बिघाड झाला होता. या बोटीत ३४ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. दुसऱ्या फेरीच्या मदतीने सर्वांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. या दुर्घटनेनंतर आता हायस्पीड बोट बुडाल्याने गेटवे परिसरातील जलवाहतुकीच्या सुरक्षाव्यवस्थेकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

फेरीबोटींच्या सुरक्षेचाही आढावा
गेटवे परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जुन्या लाकडी फेरीबोटींचाही वापर केला जातो. त्यांच्या समुद्रयोग्यतेबाबत नियमित सर्वेक्षण आणि देखभालीबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी लाईफ जॅकेटसह निर्धारित सुरक्षा नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते, याचाही आढावा घेण्याची गरज आहे.
---
४५० हायस्पीड बोटींच्या परवान्यांची पडताळणी
वांद्रे आणि मोरा येथे एकूण ४५० खासगी हायस्पीड बोटींची नोंदणी असल्याची माहिती आहे. त्यापैकी सुमारे ३६ बोटी प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणीकृत असल्याचे सागरी महामंडळाने सांगितले आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींची कागदपत्रे आणि परवान्यांची नियमित पडताळणी होते का, याचीही खातरजमा करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT