मुंबई

‘प्रत्येक युगात वस्त्रहरण होते; आपणच आधार बनूया’

CD

‘प्रत्येक युगात वस्त्रहरण होते; आपणच आधार बनूया’
श्रीकृष्ण अवतारातील दोन इंचांच्या गणेशमूर्तीतून महिला सुरक्षेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २० : महिला सुरक्षा, स्त्री-सन्मान आणि संकटाच्या काळात पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश देत श्री सिद्धिविनायक फेस्टिव्हल मंडळाने यंदा ‘श्रीकृष्ण अवतार-आजच्या अन्यायावर मात’ ही संकल्पना साकारली आहे.
१९८९ मध्ये स्थापना झालेल्या या मंडळाने यापूर्वी विविध सामाजिक विषयांवर आधारित गणेशोत्सवाच्या संकल्पना मांडल्या आहेत. यंदाच्या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ दोन इंच उंचीची श्रीगणेशाची ‘श्रीकृष्ण अवतारातील’ मूर्ती. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगात श्रीकृष्णाने केलेल्या रक्षणाचे प्रतीकात्मक रूप या मूर्तीतून साकारण्यात आले आहे. ही मूर्ती कारागीर पुवनेश सेल्वन नाडर यांनी तयार केली आहे. आजच्या काळातील महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि सामाजिक असंवेदनशीलतेविरोधात आवाज उठविण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.
मंडळाने या संकल्पनेला पूरक असा लघुपटही तयार केला आहे. विकास राहुल यांनी या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. महाविद्यालयातून घरी जात असलेल्या तरुणीचा काही तरुणांकडून छळ केला जातो. त्या वेळी तेथून जाणारी महिला डिलिव्हरी एजंट तिच्या मदतीला धावून येते आणि तिला वाचवते.
यानंतर तरुणीचा भाऊ मदतीसाठी पोलिस, वकील आणि डॉक्टरांकडे जातो, मात्र कथानकात संबंधितांकडून मदतीस टाळाटाळ केली जाते. अखेरीस एका छोट्या क्लिनिकमधील डॉक्टर मदतीचा हात पुढे करतात. संकटाच्या वेळी पद, पैसा किंवा अधिकारापेक्षा माणुसकी महत्त्वाची असल्याचा संदेश लघुपटातून देण्यात आला आहे.
‘प्रत्येक युगात वस्त्रहरण होतच राहील; मात्र पीडितांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आपण स्वतः पुढे आले पाहिजे. गरजवंतांचे रक्षण करण्यासाठी आपणच त्यांचा आधार बनले पाहिजे,’ असा संदेश मंडळाने दिला आहे.
यापूर्वी मंडळाने सिगारेट बॉक्स गणपतीद्वारे धूम्रपानविरोधी जनजागृती, प्लॅस्टिक गणपतीद्वारे पर्यावरण संवर्धन, कपूर गणपतीतून मानसिक स्वच्छता आणि ‘राम गणेश अवतार’द्वारे मानसिक आरोग्याचा संदेश दिला होता.

गणेशभक्ती ही केवळ पूजा-अर्चा नसून स्त्री-सन्मान, मानवी संवेदना आणि सामाजिक उत्तरदायित्वाचेही साधन आहे. गणराया प्रत्येक घरी फक्त सुख, समृद्धीच नव्हे तर महिलांसाठी सुरक्षित वातावरण, निडरता आणि मानवी मूल्यांचा आदर घेऊन येवो, हीच प्रार्थना!
सेल्वन नाडर,
अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक फेस्टिव्हल मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT