संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
कोची, ता. २० : बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्सना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून आपल्या अभ्यासक्रमात बदल करणार आहे. यासाठीची घोषणा रविवारी (ता. २०) कोची येथे भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय परिषदेत करण्यात आली.
विद्यमान अभ्यासक्रमात ‘एआय’चा पुरेसा समावेश नसल्याने कार्यरत सीए सदस्यांसाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स अंडरस्टँडिंग फॉर रायझिंग एच्युवर्स (ऑरा-१) हा विशेष ऑनलाइन प्रशिक्षणक्रम सुरू करण्यात आला आहे.
‘ऑरा-१’ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अधिक प्रगत स्वरूपाचे एआय प्रशिक्षण देण्याबरोबरच कौशल्यविकास, स्टार्टअप आणि उद्योजकता कार्यक्रम तसेच अन्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. विद्यमान अभ्यासक्रमातून ‘एआय’चे प्रशिक्षण घेता न आलेल्या सीए सदस्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. सहभागी सदस्यांना आभासी माध्यमातून ‘एआय’च्या विविध पैलूंचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच चॅटजीपीटी, कपिलॉट तसेच इतर एआय साधनांचा त्यांच्या उपयोगानुसार अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष व सीए मंगेश किनारे यांनी दिली.
एआय क्षेत्रातील पुढील विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंगापूरमधील चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संस्थेसोबत सहकार्याबाबत चर्चा झाली असून, भविष्यात सामंजस्य करार करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, देशाच्या उभारणीत ‘आयसीएआय’चे योगदान महत्त्वाचे असून, संस्थेने जागतिक स्तरावरही आपली भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी होणाऱ्या संवादातून गैरसमज दूर करण्याबरोबरच संस्थेच्या कामकाजाबाबत सकारात्मक सूचना मिळण्यास मदत होते. त्यामुळे अशा संवादांचे सातत्य राखणे आवश्यक असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष सीए प्रसन्ना कुमार डी. म्हणाले.
तीन दिवसांचे प्रशिक्षण
‘आयसीएआय’ने गेल्या सुमारे तीन वर्षांपासून एआयला अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या संकल्पनेचा भाग म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली आहे. संस्थेने स्वतःचा एआयविषयक अभ्यासक्रम तयार केला असून, त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव असलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सची मदत घेतली जात आहे. तसेच एआय प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा तीन दिवसांचा प्रत्यक्ष प्रशिक्षणावर आधारित अभ्यासक्रम असून, तो चार्टर्ड अकाउंटंट्सच्या व्यावसायिक आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
१२ हजारांहून अधिक जणांना नोकऱ्या
‘आयसीएआय’च्या प्लेसमेंट प्रक्रियेत दोन टप्प्यांमध्ये १२ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. पहिल्या टप्प्यात मोठ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रक्रियेत ८ हजार ९११ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. त्यानंतर छोट्या शहरांमध्ये घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात तीन हजार ३०५ नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. अशा प्रकारे पाच हजार ८३४ उमेदवारांसाठी एकूण १२ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.
काेची : ‘आयसीएआय’च्या दाेनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.