रोजगार महाकुंभातून ७१ हजार रोजगाराच्या संधी
मुंबई, ता. २१ : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’साठी आतापर्यंत १,५८८ नामांकित आस्थापनांनी नोंदणी केली आहे. या आस्थापनांच्या माध्यमातून ७१ हजार ९३९ प्राथमिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सीएट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स यांसह विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
नवीन उमेदवारांसह अनुभवी उमेदवारांसाठीही विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आयटीआय, बारावी, पदवी, डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ट्रेनी, अप्रेंटिस, सेल्स आणि ग्राहक सेवा यांसारख्या पदांचा समावेश आहे. शासनाशी निगडित संस्थांमध्येही युवकांना कामाची संधी मिळणार आहे. मंगळवारपर्यंत (ता. २९) सहभागी कंपन्यांची संख्या अडीच हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध रोजगाराच्या संधींमध्येही आणखी वाढ होईल, असे लोढा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.