बीडीडीच्या भूखंडाला भाडेकरू मिळेना!
नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील भूखंड भाडेपट्ट्याने कोणी घेईना; ८०० कोटींचा महसूल उभारण्याचे म्हाडाचा प्रयत्न फोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळकाऱ्यांसाठी पुनर्वसन इमारती उभारून शिल्लक राहणारे भूखंड भाडे पट्ट्याने देण्याचा निर्णय घेतला म्हाडाने होता. त्यानुसार काढलेल्या निविदेला प्रतिसादच मिळत नाही. हे भूखंड भाडेपट्ट्याने घेण्यास भाडेकरूच मिळत नसल्याने त्यामाध्यमातून सुमारे ८०० कोटी रुपयांचा महसूल उभा करण्याचा म्हाडाचा प्रयत्न फोल ठरला असून, या भूखंडावर आता निवासी इमारती उभारण्याचा म्हाडाकडून विचार सुरू आहे.
म्हाडाकडून बीडीडीवासीयांना गगणचुंबी टाॅवरमध्ये ५०० चौरस फुटांची सुसज्ज घरे दिली जात आहेत. त्यानुसार घरांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेवर इमारती उभारून शिल्लक राहणा-या भूखंडावर व्यवसायिक इमारती उभारण्याचे नियोजन आहे. दरम्यान, म्हाडाने नायगाव येथील १,७०० चौरस मीटरचा, तर ना. म. जोशी मार्ग येथील २,२०० मीटरचा भूखंड चटई क्षेत्रफळासह ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार नायगावच्या भूखंडा भाडेपट्टा ३७१ कोटी रुपये, तर ना. म. जोशी मार्ग येथील भूखंडाचा ४३८ कोटी रूपये किमान भाडेपट्टा निश्चित केला होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर भूखंड भाडेतत्त्वावर न देता तेथे निवासी इमारती उभारता उभारून त्याची खुल्या बाजारात विक्री करता येईल का, याची चाचपणी म्हाडाने सुरू केली आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरचा प्राधिकरणात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पदरमोड करावी लागणार
सध्या वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीच्या रहिवाशांकरिता पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे सदर कामासाठी आवश्यक असलेला निधी उर्वरित भूखंड भाडेपट्ट्याने देऊन उपलब्ध करण्याचे नियोजन होते, मात्र त्याला भाडेकरूच मिळत नसल्याने म्हाडाला यापुढेही पदरमोड करूनच पुनर्वसन इमारती उभारण्याचा खर्च करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.