मुंबई

सीआयएसएफला दिल्या जाणाऱ्या भाड्याच्या घरांनी म्हाडा मालामाल

CD

सीआयएसएफला दिल्या जाणाऱ्या भाड्याच्या घरांनी म्हाडा मालामाल
महिन्याला एक कोटी १७ लाख रुपये भाडे मिळणार; डिपाॅझिटपोटी दोन कोटी ३४ लाखांचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाच्या कोकण मंडळाडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) शिरढोण येथील भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या घरांच्या माध्यमातून म्हाडा मालामाल होणार आहे. येथील सुमारे १,१५० घरे सीआयएसएफला भाड्यावर दिली जाणार असून, त्या माध्यमातून महिन्याला तब्बल एक कोटी १७ लाख रुपये भाडे मिळणार आहे. तसेच डिपाॅझिटपोटी दोन कोटी ३४ लाख रुपये म्हाडाला मिळणार आहे. त्याबाबत म्हाडा आणि सीआयएसएफमध्ये करानामा होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील शिरढोण येथे म्हाडाचा सुमारे १८ हजारांहून अधिक घरांचा मोठा गृहप्रकल्प सुरू आहे. त्यापैकी अल्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या १९०५ घरांसाठी २०१८ मध्ये, तर २०२५ मध्ये सुमारे पाच हजार घरे लाॅटरीद्वारे उपलब्ध करून दिली होती, मात्र विक्री न झालेली अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठीची सुमारे ३००-४०० चौरस फुटांची १,१५० घरे एकगठ्ठा सीआयएसएफच्या जवानांसाठी दिली जाणार आहेत. त्यानुसार अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या ३०० चौरस फुटांच्या घराला महिन्याला आठ हजार रुपये तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या ४०० चौरस फुटांच्या घरांसाठी १३ हजार रुपये भाडे मिळणार आहे. तसेच प्रत्येक घरासाठी दोन महिन्याचे भाडे डिपाॅझिट म्हणून घेतले जाणार आहे. त्यामुळे म्हाडा मालामाल होणार असल्याचे कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सदर घरांच्या करारनाम्याचा मसुदा म्हाडाने सीआयएसएफला दिला असून, त्याला केंद्रातून मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आधी पैसे मग करारनामा
सीआयएसएफने म्हाडाची घरे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार म्हाडाने दिलेला कारानाम्याचा मसुदा सीआयएसएफने मंजुरीसाठी आपल्या मुख्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे सीआयएसएफ म्हाडाची घरे भाड्याने घेणार हे निश्चित झाले असले तरी आधी डिपाॅझिटची आणि भाड्याची रक्कम म्हाडाला वळती केल्यानंतरच करारनामा केला जाईल. आधी पैसे मग करारनामा अशी म्हाडाने भूमिका घेतली आहे.

मेंटेनन्स म्हाडाला भरावा लागणार
म्हाडा सीआयएसएफला शिरढोणची घरे भाडेतत्त्वावर देत आहे. त्यामुळे सदर घरांच्या देखभालीबरोबरच मेंटेनन्सचा इतर खर्च म्हाडाला करावा लागणार आहे. त्याशिवाय पाणीबिल, मालमत्ता करही म्हाडाला भरावा लागणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत
म्हाडाच्या शिरढोण येथील प्रकल्पात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान वास्तव्यास असल्यानंतर संपूर्ण वसाहतीतील रहिवाशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आणखी विश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. त्यामुळे येथील घरांना भविष्यात आणखी मागणी वाढेल असा विश्वास म्हाडाकडून व्यक्त केला जात आहे.

- सीआयएसएफला दिली जाणारी एकूण घरे - १ १५०
- घरांचे क्षेत्रफळ - ३००-४०० चौरस फूट
- अत्यल्प उत्पन्न गटातील घरासाठी भाडे - ८,००० रुपये
- अल्प उत्पन्न गटातील घरासाठी भाडे - १३,००० रुपये
- मासिक एकूण भाडे - एक कोटी १७ लाख रुपये
- डिपाॅझिट रक्कम - दोन कोटी ३४ लाख रुपये
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

SCROLL FOR NEXT