मुंबई

महापरिनिर्वाण दिनासाठी २० कोटींची तरतूद करा : आठवले

CD

महापरिनिर्वाण दिनासाठी २० कोटींची तरतूद करा : आठवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेने किमान २० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रशासनाला केली. ६ डिसेंबरला रविवार असल्याने यंदा अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने सुरक्षा आणि सुविधांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे सोमवारी (ता. २) आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या आढावा बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार उपस्थित होते. या वेळी रामदास आठवले यांनी महापालिका, पोलिस, रेल्वे आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. रविवारच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने त्या दिवशी मेगाब्लॉक घेऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि दिशादर्शक फलक वाढविण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले. १ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील भीमस्मारकांना भेट देण्यासाठी बेस्टतर्फे मोफत बससेवा, तसेच अनुयायांसाठी भोजनव्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली. मागील वर्षीच्या १५ कोटींच्या तुलनेत यंदा २० कोटींचा निधी उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

संविधान पथाची उभारणी!
चैत्यभूमी ते इंदू मिलदरम्यान समुद्रात भराव टाकून संविधान पथ उभारण्यासाठी ‘सीआरझेड’ची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. चैत्यभूमी स्तूपाचा पुनर्विकास, तसेच राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : 'संविधानाला धक्का लागू देणार नाही!' फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Dates & Coconut Ladoo: यंदाच्या दिवाळीत फराळात बनवा हटके पदार्थ! साखरेशिवाय तयार करा खजूर-नारळाचे पौष्टिक लाडू; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT