

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
पुण्यातील गाजलेल्या पायल पवार-झांबरे प्रकरणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सासरच्या मंडळींच्या अमानुष शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून पायल यांनी आत्महत्या केल्याची गंभीर तक्रार त्यांच्या माहेरच्या कुटुंबाने केली असून, याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात सासरच्या चार जणांवधिर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.