मुंबई

महाराष्ट्राला नवोपक्रमांचे केंद्र बनविणार!

CD

महाराष्ट्राला नवोपक्रमांचे केंद्र बनविणार!
महाराष्ट्र उच्च शिक्षण परिषदेचे उद्‍घाटन
मुंबई, ता. २ : उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना देशाच्या विकासात योगदान देणारा सुजाण नागरिक बनवणे हा आहे. त्यासाठी महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि एलेट्स टेक्नोमीडियाच्या सहकार्याने डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषदेच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण बनविणे आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात यावेत, संशोधकांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषद २०२६ हे त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.
---
कुशल मनुष्यबळ घडवणार!
बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजांनुसार उद्योग व बाजारपेठेला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडविणे, संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम बनविणे, ही उच्च शिक्षण विभागाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी सांगितले.

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पोकलेन अंगावर पडून शेतकरी मजुराचा मृत्यू

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT