‘ग्लोबल इंडियन्स लिस्ट’मध्ये सुंदर पिचाई अग्रस्थानी
मुंबई, ता. १३ : एचएसबीसी इंडिया आणि हुरुन इंडिया यांच्या एचएसबीसी हुरुन ग्लोबल इंडियन्स लिस्ट २०२६ या यादीत सुंदर पिचाई अग्रस्थानी राहिले आहेत. भारतीय वंशाच्या नेतृत्वाखालील जगातील २०० सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांचा या यादीत समावेश आहे.
शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांसाठी भांडवली बाजारमूल्य तर सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांसाठी हुरुन रिसर्चने केलेले मूल्यांकन विचारात घेण्यात आले आहे. या जागतिक अर्थव्यवस्थेत परदेशस्थ भारतीय समुदायाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारताबाहेर मुख्यालय असलेल्या २०० कंपन्यांमधील २३६ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), व्यवस्थापकीय संचालक (एमडी), अध्यक्ष आणि संस्थापकांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. या यादीतील कंपन्यांचे एकत्रित मूल्य १५ लाख कोटी अमेरिकी डॉलर असून, २०२४ च्या ९.९ लाख कोटी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्यात ५३ टक्के वाढ झाली आहे. या यादीत स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली किमान मूल्याची मर्यादा १.२ अब्ज अमेरिकी डॉलरवरून दुपटीहून अधिक वाढवून २.५ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. यादीतील व्यक्तींचे सरासरी वय ५५ वर्षे असून, यामध्ये १६ महिला आहेत. यंदा ७६ कंपन्यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे. यादीतील २०० कंपन्यांपैकी १२७ कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत, तर ७३ कंपन्या खासगी मालकीच्या आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये मिळून जवळपास ५३ लाख लोक कार्यरत आहेत. या कंपन्यांना २०२५ मध्ये एकत्रितपणे २.५ लाख कोटी अमेरिकी डॉलरचा महसूल मिळाला. त्यांचा एकत्रित निव्वळ नफा ४१६ अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे, अशी माहिती एचएसबीसी इंडियाच्या प्रीमियर बँकिंग विभागाचे प्रमुख संदीप बत्रा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.