मुंबई

डॉ. निरंजन चव्हाण यांना मानद फेलोशिप

CD

डॉ. निरंजन चव्हाण यांना मानद फेलोशिप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालय व सायन रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. डॉ. निरंजन चव्हाण यांना ब्रिटनच्या लंडन येथील रॉयल प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ महाविद्यालयातर्फे (आरसीओजी) प्रतिष्ठित एफआरसीओजी (ॲड ईयुंडेम) या मानद फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.

महिला आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जगभरातील निवडक स्त्रीरोगतज्ज्ञांना हा मानाचा सन्मान दिला जातो. स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मानांपैकी एक म्हणून या फेलोशिपला विशेष महत्त्व आहे. डॉ. चव्हाण यांना वैद्यकीय क्षेत्रातील अध्यापनाचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सायन रुग्णालयात दरवर्षी १२ हजारांहून अधिक प्रसूतींचे व्यवस्थापन केले जाते. त्यांच्या वैद्यकीय संशोधन कार्याचीही मोठी नोंद असून, त्यांचे १२५ हून अधिक संशोधन लेख आणि ४२ पुस्तक प्रकरणे प्रकाशित झाली आहेत. २२ ते २४ एप्रिल २०२७ दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे होणाऱ्या जागतिक वैद्यकीय परिषदेत हा सन्मान औपचारिकरीत्या चव्हाण यांना प्रदान केला जाणार आहे. या परिषदेत जगभरातील १०० हून अधिक देशांतील तीन हजारांपेक्षा अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

Latest Marathi News Live Update: लोणावळ्यातील पूरस्थितीमागील कारणांचा होणार शास्त्रीय अभ्यास; सीडब्ल्यूपीआरएसतर्फे भुशी धरण आणि इंद्रायणी नदीचे 'हायड्रॉलिक मॉडेल स्टडी'

SCROLL FOR NEXT