मुंबई

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध

CD

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध
निविदा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : बोरिवली येथील ४९० खाटांच्या भगवती रुग्णालयाचे पीपीपी तत्त्वावर खासगी संस्थेमार्फत संचालन करण्यासाठी मुंबई महापालिकेने काढलेली निविदा रद्द करावी आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन महापालिकेनेच करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आमदार भाई जगताप आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
महापालिकेने २६ ऑक्टोबरला निविदा प्रसिद्ध केली असून, १६ नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. विशेष म्हणजे २०२५ मध्येही रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्या वेळी विरोधानंतर तत्कालीन आयुक्तांनी पीपीपी प्रस्ताव रद्द केल्याचे आणि रुग्णालय सुरू करण्यासाठी मनुष्यबळ व साधनसामग्रीची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुन्हा निविदा काढण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
रुग्णालयासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करून महापालिकेनेच ते पूर्ण क्षमतेने चालवावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. पूर्वीचा निर्णय बदलून पुन्हा खासगीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यामागील कारणे प्रशासनाने सार्वजनिक करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आर्थिक तरतुदींवर प्रश्‍न
निविदेतील आर्थिक तरतुदींवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. महापालिकेला वार्षिक सुमारे ६.५० कोटी रुपये भाडे मिळणार असताना पात्र रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी संस्थेला अंदाजे ६० कोटी रुपये द्यावे लागतील, असा दावा करण्यात आला आहे. तसेच रुग्णसेवेच्या पात्रतेच्या अटींमुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना सवलतीच्या उपचारांपासून वंचित राहावे लागू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Latest Marathi News Live Update: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी 'वस्त्रसंहिता' लागू होणार

SCROLL FOR NEXT