पालिका उभारणार पाच हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे
मुंबई, ता. १३ : शहरातील खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन २२ कोटी रुपये खर्च करून पाच अतिरिक्त हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे उभारणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
प्रस्तावित ‘कंटिन्युअस ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स’ (सीएएक्यूएमएस) मुलुंड, दादर, गोरेगाव, चर्नी रोड आणि सांताक्रूझ येथे उभारली जाणार आहेत. सध्या दादर, चर्नी रोड आणि मुलुंड येथे एकही निरीक्षण केंद्र नाही. मुंबईत सध्या पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेद्वारे देखरेख केली जाणारी २९ ‘सीएएक्यूएमएस’ केंद्रे आहेत. त्यांची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय वायू गुणवत्ता निरीक्षण डॅशबोर्डला पुरवली जाते. पाच नवीन प्रस्तावित निरीक्षण केंद्रांपैकी दोन केंद्रे सध्याच्या पालिकेच्या जागेवर, तर उर्वरित तीन केंद्रे अशा ठिकाणी असतील जिथे पाच किलोमीटरच्या परिघात कोणतीही सुविधा उपलब्ध नसतील, अशा ठिकाणी उभारली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. २२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पाच वर्षांसाठी पाच केंद्रे उभारणे, संचालन आणि देखभाल यांचा समावेश आहे. ही केंद्रे सहा महिन्यांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.