ब्रेक बाइंडिंगमुळे विशेष रेल्वे रखडली
लोकल सेवांनाही फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेच्या मुलुंड-नाहूरदरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या चाकांमध्ये ब्रेक बाइंडिंग झाल्याने शुक्रवारी दुपारी रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. गोरखपूर-एलटीटी विशेष गाडी १८ मिनिटे रखडली. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावरून वळविण्यात आल्या. परिणामी जलद मार्गावरील लोकल सेवांचे वेळापत्रक विस्कळित झाले. लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुलुंड-नाहूरदरम्यान सहाव्या मार्गिकेवरून धावणाऱ्या या विशेष गाडीच्या चाकांमध्ये दुपारी २.२५ वाजता ब्रेक बाइंडिंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गाडी जागीच थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चाकांची तपासणी केली. या वेळी आवश्यक तांत्रिक कार्यवाही करताना अग्निशमन यंत्राचाही वापर करण्यात आला. त्यानंतर दुपारी २.४३ वाजता गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. विशेष गाडी रखडल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना अप जलद मार्गावरून मार्ग देण्यात आला. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. लोकल विलंबाने धावू लागल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांनाही या विलंबाचा फटका बसला. विशेष गाडी मार्गस्थ झाल्यानंतरही लोकलचे वेळापत्रक तातडीने पूर्वपदावर आले नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकल सेवांवरील परिणाम कायम होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.