मुंबई, ता. १५ : सुंदररामन राममूर्ती यांनी जानेवारी २०२३ मध्ये मुंबई शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून, एकत्रित एकूण महसूल ९५४ कोटींवरून ५,१४८ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे आता वाढीच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राममूर्ती यांच्या कार्यकाळात ‘बीएसई’च्या महसुलात, नफ्यात आणि डेरिवेटिव्ह ट्रेडिंगच्या उलाढालीत वेगाने वाढ झाली. कामकाजातून मिळणारा महसूल वित्त वर्ष २०२४ मधील १,३७१ कोटी रुपयांवरून वाढून वित्त वर्ष २०२५ मध्ये २,९५७ कोटी रुपये झाला. तर व्याज, कर, घसारा आणि कर्जमुक्तीपूर्वीची कमाई (इबिटडा) मार्जिन २८ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांपर्यंत वाढली.
या कालावधीत डेरिव्हेटिजच्या उलाढालीचाही विस्तार झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, वित्त वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत, सरासरी दैनिक डेरिव्हेटिज प्रीमियम उलाढाल, ९६ टक्क्यांच्या वाढीसह २९,६१५ कोटी रुपयांवर झेपावली आहे. गेल्या काही वर्षांत बीएसईच्या विकासाच्या मूल्यमापनात हा विभाग केंद्रस्थानी राहिला आहे. एकूण उलाढालीतील वाढीमुळे व्यवहाराचा प्रभाव दिसून येतो असेही बोलले जात आहे. बीएसई ने उच्च श्रेणीच्या आणि मोठ्या उलाढालींच्या व्यवहारांना पाठिंबा दिल्यानेच एकंदरित व्याप्ती वाढल्याचे दाखवून दिले जात आहे, तर प्रत्यक्ष ट्रेडिंगमधील वाढ ही एक्स्चेंजचीच वाढ दाखवून देते. महसूल आणि मार्जिनचे आकडे आर्थिक बदल दर्शवतात. यातूनच बीएसईची कामगिरी सर्वसमावेशक असल्याचे दिसते, असे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.