मुंबई

संशयास्पद उत्पादनांवर छापे

CD

संशयास्पद उत्पादनांवर छापे
मान्यता नसलेल्या घटकांचा वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : न्यूट्रास्युटिकल्सच्या नावाखाली बाजारात उतरवण्यात येणाऱ्या उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई करत या बाजाराला मोठा दणका दिला आहे. अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता नाकारलेल्या घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा तब्बल एक कोटी ३८ लाख ९५ हजार ८५२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

‘मॅग्नेशियम ॲसिटाइल टॉरेट’ आणि ‘निकोटिनामाइड मोनोन्यूक्लिओटाइड’ या घटकांना उत्पादन मान्यता नाकारण्यात आली असतानाही त्यांचा वापर होत असल्याचे ‘एफडीए’च्या कारवाईत समोर आले. राज्यातील सात विभागांमध्ये १७ आस्थापनांची तपासणी करून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुंबईतील सहा पानटपऱ्यांवरही छापे टाकण्यात आले. दहिसर पूर्व, धारावी, गोरेगाव पश्चिम आणि अँटॉप हिल परिसरातील या दुकानांतून बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा ३१ हजार १४९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यातील कारवाईत प्रतिबंधित खाद्यपदार्थांसह वाहन मिळून पाच लाख ६१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या आस्थापनातून संशयित खाद्यतेलाचे २१ हजार ४ लिटर साठवणूक केलेले तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत ४५ लाख ९५ हजार २६० रुपये आहे. या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT