मुंबई

महिलेच्या घराबाहेर अश्‍लील कृत्य

CD

महिलेच्या घराबाहेर अश्‍लील कृत्य
तरुणाला महिनाभराचा कारावास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरात एका महिलेच्या घराबाहेर तिच्यासमोरच अश्‍लील कृत्य केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
विशेष म्हणजे घटनेनंतर सहा वर्षांनी न्यायालयात साक्ष देताना पीडितेने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. मात्र, केवळ तक्रारदार महिलेला खटला पुढे चालवायचा नाही म्हणून आरोपीला कायदेशीर कारवाईतून अभय देता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दंडाधिकारी रवींद्र डी. गवई यांनी नोंदवले. आरोपीने महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र, आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिला घरापर्यंत गाठल्याचे सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने त्याला पाठलागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. मात्र, महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. गुन्हा घडला तेव्हा तो अवघ्या २० वर्षांचा होता. घटनेला अनेक वर्षे उलटली असून, तो जामिनावर बाहेर आहे. या बाबींचा विचार करून न्यायालयाने त्याला एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, तो दावा न्यायालयाने फेटाळून लावला.
...
नेमकी घटना काय?
संबंधित घटना २२ ऑक्टोबर २०१९ला घडली होती. संबंधित पीडिता फिरायला जाऊन घरी परतल्यानंतर घराची बेल वाजवताना आरोपी हा इमारतीच्या पॅसेजमध्ये उभा होता. त्याने महिलेसमोर अश्‍लील कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने सर्वप्रथम सोसायटीच्या सचिवांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सोसायटीतील सदस्यांसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. आरोपीचे वडील संबंधित इमारतीत सफाई कर्मचारी होते. पोलिस ठाण्यात महिलेने आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.
...
भूमिका बदलली
महिलेने २०२५ मध्ये उलट तपासणीदरम्यान या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा नसल्याचे आणि आरोपीविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. आरोपीच्या वडिलांनीही महिलेची माफी मागितली होती. मात्र, घटनेनंतर तब्बल सहा वर्षांनी महिलेची साक्ष नोंदवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT