सोनाक्षी सिन्हा प्रकरणातील अटकेची प्रक्रिया बेकायदा
दिल्लीतील तरुणाची मुक्तता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे आक्षेपार्ह फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्लीत अटक केलेल्या तरुणाला मुंबईत आणणाऱ्या पोलिसांच्या कारवाईवर वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अटकेदरम्यान कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपी आर्यन दीपक जैनची मुक्तता करण्याचे आदेश दिले. तसेच तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची पोलिसांची मागणीही फेटाळली.
सोनाक्षीच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील शाहदरा परिसरातील जगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १४ नोव्हेंबरला सकाळी आर्यनला ताब्यात घेऊन विमानाने मुंबईत वांद्रे न्यायालयात हजर केले. आक्षेपार्ह छायाचित्रे तयार करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण शोधण्यासाठी आर्यनच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणीही पोलिसांनी केली होती, मात्र आरोपीला दिल्लीतील संबंधित क्षेत्रातील जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर न करताच (ट्रान्झिट रिमांड) थेट मुंबईत आणल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. या प्रक्रियेचे पालन न करण्यामागील समाधानकारक कारणही देण्यासही तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
...
न्यायालयाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे
सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या विविध कालमानुसार अटकेची आवश्यकता स्पष्ट करणारी कारणे नोंदवणे बंधनकारक आहे. तसेच पुढील तपास करायचा आहे म्हणून एखाद्याला अटक करून कोठडीत ठेवता येणार नाही. त्यासाठी कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन होणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करून न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.