mumbai
mumbai sakal
मुंबई

Mumbai : बेशिस्त चालकांकडून ६३ लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

मुरूड - रायगड जिल्हा वाहतूक शाखेने नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सिग्नल तोडणे, परवाना नसणे, दुचाकींवरून ट्रीपल सीट जाणे, अतिवेगात वाहने चालविणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे आदी वाहतूक नियमांची पायमल्‍ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात २०२२ मध्ये वाहतूक विभागाने २० हजार ८३४ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करीत तब्बल ६२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्‍याची माहिती रायगड वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. तर २०२१ मध्ये वाहतूक शिस्त न पाळणाऱ्या २४ हजार ०३४ चालकांकडून ७९लाख सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांची चालकांना माहिती मिळावी, यासाठी वाहतूक विभागाकडून नियमित जनजागृती उपक्रम राबवले जात असल्‍याचे यावेळी पत्‍की यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT