मुंबई

एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचा घवघवीत यश

CD

एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचा घवघवीत यश
१७ विद्यार्थ्यांचा सत्कार; शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा गौरव
म्हसळा, ता. २८ (बातमीदार) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे इयत्ता आठवीच्या एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १७ विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यालयाचे चेअरमन समीर बनकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. योग्य नियोजन, सातत्य व स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी आत्मविश्वास हा यशाचा पाया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात पर्यवेक्षक जे. के. मांजरेकर यांनी एनएमएमएस परीक्षेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. जान्हवी मेंदडकर, तनिष्का गुरव, हर्षवर्धन पाटील, कस्तुरी दर्गे, मयुरी जावरे, मयुरी शिगवण, श्रावणी राजेंद्र, श्रावणी म्हशीलकर, सम्यक सावंत, संघवी जाधव, खुशी सुतार, दिव्या आगरकर, अक्षरा कांबळे, आनंद सावंत, प्रिया कोरे, दृष्टी दर्गे, पूर्वा कांबळे व स्वामी करंबे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सूत्रसंचालन एच. बी. मोरे यांनी केले तर आभार आमले सर यांनी मानले.
चौकट
नियोजनबद्ध तयारीमुळे यश
विद्यालयाने स्पर्धा परीक्षांसाठी केलेल्या नियोजनबद्ध सराव, अतिरिक्त तास व सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच १७ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत यशस्वी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा आदर्श ठरला आहे.एण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT