मुंबई

नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार

CD

नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार
स्वदेश फाउंडेशनकडून सन्मान; ग्रामस्थांच्या उपक्रमांची दखल
म्हसळा, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील नळेफोडी गावाने एकजूट आणि विकासकामांच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली असून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने गावाला ‘स्वप्नातील गाव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रायगड किल्ल्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावात ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. गावातील श्री विघ्नहर्ता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. ग्रामस्थांमधील एकोपा हे या गावाचे प्रमुख वैशिष्ट्य असून राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी गावाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम केले आहे.
ज्येष्ठ मंडळी वामन महादे, चंद्रकांत महादे, लक्ष्मण महादे तसेच उपसरपंच नथुराम चाचले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सहकार्याने अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली. बसथांब्यापासून शाळेपर्यंत रस्त्यालगत प्रकाश व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प, गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाइन सुविधांसाठी मोफत वाय-फाय, तसेच पाण्यासाठी विहीर व धरण बांधकाम अशी कामे गावात करण्यात आली आहेत.
ग्रामस्थांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वदेश फाउंडेशनने नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार देऊन गौरविले असून या सन्मानामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सोबत फोटो आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

SCROLL FOR NEXT