मुंबई

जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवडा बाजार आणि खाद्ययात्रा

CD

जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवडा बाजार आणि खाद्ययात्रा
म्हसळा, ता. १५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या आहाराबाबत माहिती, बाजारहाट, सामाजिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण यांचे सखोल ज्ञान आणि जागरूकता निर्माण व्हावी तसेच स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पीएमश्री रा. जि. प. शाळा म्हसळा येथे आठवडा बाजार आणि खाद्यजत्रा घेण्यात आली होती. यामध्ये व्हेज कटलेट, वडापाव, भेळ, सरबत, भजी, फालुदा, आंबा पन्हे, कांदा पोहे, अप्पे, सॅलड आदी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.
सभापती बबन मनवे यांच्या हस्ते या आठवडा बाजार आणि खाद्य महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य अभिषेक विचारे, नगराध्यक्ष अनिकेत पानसरे, पं. स. सदस्या समृद्धी चाचले, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, माजी नगरसेविका संपदा पोतदार, समाजसेविका नीता ढवळे, संतोष पाखड, केंद्रप्रमुख धामणकर, दिलीप करंबे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबू शिर्के, मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, श्रीधर उमदी, मिलिंद मुंडे, जयश्री गायकवाड, इंदिरा चौधरी, नरेश गावित, विषय शिक्षक अनिल बेडके, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो -पी. एम. श्री स्कूल येथे आयोजित आठवडा बाजार आणि खाद्य जत्रेत सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करताना जि. प. सदस्य अभिषेक विचारे सोबत सभापती बबन मनवे. (छाया -उदय कळस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT