मुंबई

मार्गदर्शक तत्त्वावरून महासभेत गदारोळ

CD

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मात्र ती सर्वांची दिशाभूल करणारी असून आपल्याला मान्य नसल्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. एवढेच नाही तर विरोधी पक्षानेत्या आफरीन सय्यद हुसेन यांनी आज (ता. १३) सभागृहात मार्गदर्शक तत्त्वाची नियमावलीच फाडली.

गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत गदारोळ झाल्याने महासभा तहकूब करावी लागली होती. त्यानंतर महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला महासभेचे कामकाज सुरळीतपणे चालावे, यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. शुक्रवारी झालेल्या तहकूब महासभेसाठी त्याची अंमलबजावणी सुरू केली. नियमावलीनुसार महासभेसाठी नागरिक व पत्रकारांवर प्रवेशासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी महापालिका मुख्यालयाला पोलिस छावाणीचे स्वरूप आले. नगरसेवकांसह, नागरिक व पत्रकार यांची कसून तपासणी करूनच त्यांना महासभेसाठी सोडण्यात आले.

महासभा सुरू होताच विरोधी पक्षांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमावलीवर जोरदार आक्षेप घेतला. नियमावलीला कायदेशीर आधार काय, नियमावली निष्पक्ष रीतीने बनविण्यात आलेली नाही, नियमावली तयार करण्याचे अधिकार महासभेला असून ते पुन्हा महासभेपुढे आणावेत व त्यावर चर्चा करावी, आदी मुद्दे विरोधी पक्षांनी उपस्थित केले. ही नियमावली आम्हाला मान्य नाही, अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेत्या हुसेन यांनी यावेळी चक्क सभागृहात नियमावली फाडली.

प्रशासनाकडून समर्थन
ही नियमावली महापौरांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तयार करण्यात आली आहे, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त सचिन बांगर यांनी सभागृहात केला. स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनीदेखील नियमावलीचे समर्थन करत, ही नियमावली सर्वांच्या सोयीसाठी व सभागृहाचे काम सुरळीतपणे व पारदर्शक पद्धतीने चालावे, यासाठी ही नियमावली असून विरोधी पक्षांनी त्यांच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger Politics : "भाजपला दूर ठेवून आम्ही पुढे कसे जाणार?"; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणातील सर्वात मोठा पेच उघड!

मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प होताच २०२४ च्या 'त्या' घटनेची आठवण; एका अपडेटनं जगभर उडवला होता गोंधळ

Latest Marathi News Live Update: मेहत्रे वस्ती येथील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

SCROLL FOR NEXT