मुंबई

कल्‍याणमध्‍ये १२७ दात्यांचे रक्तदान

CD

कल्याण, ता. ३ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे धर्मवीर आनंद दिघे यांची रक्‍तदान शिबिराची परंपरा अखंडपणे सुरू ठेवण्‍यात आली. रक्तानंद ग्रुपचे हे २८ वे वर्षे असून, मध्यरात्रीच्या शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना गौरव चिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख विजय साळवी, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, ठाण्याचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, शहरप्रमुख सचिन बासरे, शरद पाटील, महिला शहर संघटक मीना माळवे आदि मान्यवर उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडता उपक्रम म्हणजे मध्यरात्री रक्तदानाने नववर्षाचे स्वागत. ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू ठेवून शिवसेनेच्या निष्ठेची व स्वाभिमानी रक्तदात्यांचे संघटित बळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले, असे गौरवोद्गार ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख, रक्तानंदचे सरचिटणीस नारायण पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

Gold Rate Today: महिन्याभरात सोनं तब्बल 14 हजारांनी स्वस्त! चांदीतही मोठी घसरण; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे ताजे भाव

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

IAS Transfer Maharashtra : राज्यातील पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आठवड्यात दुसऱ्यांदा बदली, अन्न नागरी पुरवठा, महावितरणमध्ये मोठा बदल

SCROLL FOR NEXT