मुंबई

अनिल परब यांना ईडीचा धक्का

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची टाच आली असून त्यांची तब्बल १०.२० कोटींची संपत्ती ईडीने बुधवारी तात्पुरती जप्त केली आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये ४२ गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टचा समावेश असल्याचे ईडीने परिपत्रकात म्हटले आहे.
ईडीने म्हटले आहे, की अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभा साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या मिळवल्या. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी मुरूड दापोली येथील ४२ गुंठे जमीन व साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ज्याची किंमत १० कोटी एवढी असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते; मात्र ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आलेले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लॉण्डरिंगचा आरोप करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT