मुंबई

भिवंडीत चार गोदामांना आग

CD

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : तालुक्यातील ओवळी गावात मिनी पंजाब हॉटेलजवळ सागर कॉम्प्लेक्समधील ट्रॅव्हल बॅग बनविणाऱ्या चार गोदामांना आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमन दल आणि खासगी पाच वॉटर टँकरच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ओवळी गावातील गोदामात बॅग बनविण्याचा कच्चा माल व तयार मालाचा साठा होता. आज सकाळी लागलेल्या आगीत बॅगसह मशिनरी जाळून खाक झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी कारखान्याच्या मागील भिंतींना मोठे भगदाड पाडावे लागले. त्यामधून पाण्याचा प्रवाह आत सोडून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

माधुरी दीक्षितच्या सासूसासऱ्यांना पाहिलंत का? कुठे राहतात, काय करतात श्रीराम नेने यांचे आई- वडील?

Maharashtra Drought : दुष्काळाचे विदारक चित्र ! पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाला बाजारात विकताना शेतकरी हमसून रडला, VIDEO VIRAL

'मी अनेक वर्षांपासून गहू खाल्लाचं नाही' ऐश्वर्या नारकर इतकं वय होऊनही फिट कशा? म्हणाल्या...'घरगुती डबा अन् साधा आहार'

SCROLL FOR NEXT