मुंबई

अरुंद दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी

CD

वाशी, ता. १० (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली येथील रिलायबल चौकामध्ये अरुंद दुभाजकामुळे वाहनांचे वारंवार अपघात होत असतात. त्यातच या अरुंद चौकामुळे वाहतूक कोंडीही होत असते. रिलायबल कंपनीचे खासगी सुरक्षा रक्षक या चौकामध्ये कंपनीच्या वाहनांना जाण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असल्याने अन्य वाहनचालकांचा खोळंबा होत असल्याने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे रिलायबल चौकातील दुभाजक रुंद करण्यात यावा, अशी मागणी रबाळे वाहतूक शाखेकडून पालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील रिलायबल प्लाझा चौक; तसेच रिलायबल प्लाझा चौकाला लागून जुना चिंचपाडा, गवतेवाडी, यादवनगर, एमआयडीसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे हा चौक नेहमी गजबजलेला असतो. या चौकांमध्ये असणारा दुभाजक हा अरुंद असल्यामुळे लहान-मोठ्या वाहनांना वळण घेण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच रिलायबल प्लाझा चौक या ठिकाणी दुभाजकांच्या मधोमध पालिकेचा विजेच्या खांबाला डीपी असल्याने त्याचा अडथळा येत आहे. त्यामुळे या दुभाजकामधील येणारा विजेचा खांब आणि डीपी हे ३० फूट मागे घेण्यात यावेत. तसेच, दुभाजकाची लांबी कमी करण्यात आल्यास येथील वाहतूक कोंडी सुटू शकेल, असे वाहतूक पोलिसांनी पालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

रिलायबल प्लाझा चौकामध्ये दुभाजक रुंद करण्यात येण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. या ठिकाणचा दुभाजक रुंद झाल्यास येथील वाहतूक कोंडी सुटण्यात मदत मिळेल.
- गोपाल कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे


रिलायबल चौकात बेशिस्त वाहनचालकांमुळे नेहमीच या ठिकाणी अपघात होत असतात. त्यातच या रस्त्यामध्ये दुभाजकही अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. ठाणे-बेलापूर मार्गावरील ठाण्याकडून वाशीकडे येणाऱ्या मार्गावर सिग्नल यंत्रणाही पुढे बसवण्यात आली आहे. ती मागे घेण्यात यावी.
- राकेश मोकाशी, वाहनचालक

ठाणे-बेलापूर मार्गावरील रिलायबल प्लाझा चौकांची पाहणी करून अभियंता विभागाला कळवण्यात येईल.
- महेंद्र संप्रे, सहायक आयुक्त, ऐरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT