मुंबई

नवी मुंबईतील ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या ६० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत शाळांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक होत आहे.
३१ जुलै २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात पालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे ५०९ व इयत्ता आठवीचे ४५३ असे एकूण एक हजार ६२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. यामधून इयत्ता पाचवीच्या ४९ व इयत्ता आठवीच्या ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती पटकावत पालिका शाळांचा शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावल्याचे सिद्ध केले आहे. या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण विभागामार्फत अभ्यास सहल काढली जाणार आहे. तसेच गुणवत्तावाढीसाठी पालिकेतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला ६०० रुपये प्रतिमहा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत भरले जाणार आहे. तसेच या परीक्षेकरिता मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठीही शिक्षण विभागातर्फे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
-----------------------------------------------
३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पालिकेच्या तसेच खासगी शाळांतील पाचवीचे एक हजार ७९३ व आठवीचे एक हजार ४५९ असे एकूण तीन हजार २५२ विद्यार्थी नवी मुंबईतून परीक्षेस बसले होते. यात पालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे ५०९ व इयत्ता आठवीचे ४५३ असे एकूण एक हजार ६२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी घणसोली येथील महापालिका शाळा क्रमांक ४२ मधील सर्वाधिक म्हणजे इयत्ता पाचवीचे २४ व इयत्ता आठवीचे ८ असे एकूण ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT