मुंबई

अपघात मुक्त सेवेसाठी एसटी कटिबद्ध

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. सध्या दररोज सुमारे ४० लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७५ वर्षांत अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे.
या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळातर्फे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे २४ हजार ३८९ चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे. या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य या चतुसूत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघातविरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.

कार्यक्रमांचे आयोजन
सर्व आगारांमध्ये चालक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करणे, परिवहन, पोलिस आणि इतर सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांना अपघात टाळण्याच्या उपाययोजना सांगणे, प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे, कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे आणि एसटीचा अपघात होऊ नये यासाठी नेहमी योग्य ती काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

विभाग नियंत्रकांना सूचना
- वाहनांची तपासणी नेहमी अत्यंत काटेकोर करावी व सर्व वाहने सुस्थितीत ठेवण्यात यावीत.
- सर्व आगारप्रमुख व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांनी अपघाताकडे कल असलेल्या चालकांकडे विशेष लक्ष द्यावे.
- वेगमर्यादा आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे व योग्य पद्धतीने वाहन न चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत अधिक विशेष लक्ष पुरवावे.
- सुरक्षित प्रवास होण्याच्या गरजेबद्दल सर्व चालकांनी जागरूक असावे.
- कार्यशाळेमधून बाहेर पडणारी वाहने नेहमी मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबद्दल सर्व यंत्र अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी वाहनांची खात्री करून घेण्यावर भर द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT