मुंबई

जीर्ण पुलांमुळे धोकादायक प्रवास

CD

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. १७ : डहाणू-नाशिक राज्य मार्गावर अनेक पूल व मोऱ्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच या पुलांवरील संरक्षक कठडेसुद्धा तुटलेले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता असून या पुलांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
डहाणू-नाशिक राज्य मार्गावर सारणी, वधना, रानशेत येथील रस्त्यावर कालव्यासाठी मोऱ्या तयार केल्यात. या मोऱ्या आता जीर्ण झाल्या आहेत. तसेच सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. त्यामुळे हा जीर्ण मोऱ्या आणि पुलांच्या जागी नवीन पुल बांधणे गरजेचे आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच भाजीपाला, चिकू, मासे यांची वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात येजा करीत असतात. या रस्त्यावरील सारणी येथील जीर्ण मोरीचा कठडा तुटला आहे. यामुळे येथे दोन वर्षांपूर्वी दोन दुचाकीस्वारांचा कालव्यात पडून मृत्यू झाला होता. तसेच वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या टेम्पो येथेच अपघात झाला होता. रानशेत येथील पुलावरून ट्रक पडून अपघात झाला होता. यामुळे आणखी किती अपघात झाल्यावर या मोऱ्या, पुलाची दुरुस्ती करणार, असा प्रश्न वाहनचालक विचार आहेत. सध्या डहाणू ते कासा दरम्यान या मार्गाचे डांबरीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठा निधी मंजूर झाला असूनही हे काम सुरू असतानाच या मार्गावरील जीर्ण मोऱ्या, पुलांची दुरुस्ती केल्यास सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.
......

डहाणू नाशिक हा राज्य मार्ग असल्याने पूर्वी वाहतूक खूप कमी होती; पण आता वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच रस्त्यावरील अवजड वाहनांची संख्याही वाढली आहे. यामुळे या जीर्ण मोऱ्या, पूल यामुळे अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?
- ॲड. विराज गडग, अध्यक्ष, युवा एल्गार आघाडी
...
रस्त्यावर अनेक मोऱ्या आणि पूल जीर्ण झाले असून त्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. आम्ही पाटबंधारे आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी एकत्र या मोऱ्या व पुलाची पाहणी केली असून अंदाजपत्रक तयार केले. सध्या डहाणू ते कासा रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून पुढे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
- अजय जाधव, उपअभियंता, डहाणू बांधकाम विभाग
...
सूर्या उजवा कालव्यावरील वाघाडी, सारणी, वधना, रानशेत, साखरे, वेती येथील मोऱ्या जीर्ण झाल्या असून नूतनीकरणाची गरज आहे. प्रास्ताविक कामांचा अहवाल दिला आहे. निधीला मंजुरी मिळताच काम सुरू केले जाईल.
- रवी पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, मनोर
....
कासा : सारणी कालव्यावरील मोरीचा कठडा तुटलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT