मुंबई

थंडीमुळे कांद्याच्या दरात घसरण

CD

तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसीच्या घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे. शनिवारी बाजारात कांद्याच्या १२३ गाड्यांची आवक झाली होती. त्यामुळे बाजारात काद्यांच्या दरात घसरण झाली आहे.
परतीच्या पावसाने कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. बाजारात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी होती. अशातच सध्या बाजारात नवीन कांदा नसल्याने जुना कांदा बाहेर काढला होता. त्यामुळे तीन आठवड्यापूर्वी १८ ते २२ रुपयांवर असलेला कांदा गेल्या आठवड्यात १८ ते २० रुपयांवर स्थिरावलेला होता. मात्र, सध्या पडणाऱ्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे परराज्यासोबतच बारामती, सातारा येथील नवीन कांदा दाखल होत आहे. एकीकडे नवीन कांदा बाजारात दाखल होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून बाजारात शभंरच्या वर गाड्यांची आवक होत आहे. त्याचा परिणाम कांदा ९ ते १५ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
-----------------------------------------
कांद्याचे उत्पादन पाहता शेतकऱ्यांची पुढील पिकासाठी लागणारी आर्थिक निकड पाहता दर आणखी उतरू शकतात. मार्चपर्यंत दर आणखी घसरण्याची शक्यता असून एप्रिलनंतर कांदा पुन्हा उसळी घेईल.
- मनोहर तोतलानी, व्यापारी, कांदा-बटाटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT