मुंबई

ल्युको सारकोमा कर्करोगावर यशस्वी उपचार

CD

ल्युको सारकोमा कर्करोगावर यशस्वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : एका ३८ वर्षीय मुंबईतील पुरुषावर दुर्मिळ ल्युको सारकोमा कर्करोगावर यशस्वी उपचार करण्यात झायनोवा शाल्बी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ज्यामध्ये त्याच्या कुल्ल्यातून चार सेमी आकाराची दुर्मिळ गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ३ दिवसांत रुग्णाने दैनंदिन कामे सुरू केली.
अजय खत्री यांना २०१६ मध्ये अचानक बसताना आणि झोपताना वेदना होत असल्याचे जाणवले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या वेदनेमुळे त्याच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण होऊ लागले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला ज्याने डाव्या कुल्ल्यात गाठ असल्याचे सांगितले. बायोप्सीमध्ये असे दिसून आले की ही गाठ कर्करोगाची नाही आणि शस्त्रक्रिया करून काढून टाकली. मात्र, त्याच ठिकाणी २०२१ मध्ये काही वर्षांनी पुन्हा गाठ आढळून आली. त्यानंतर, रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.
लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल यांनी म्हटले की, सुरुवातीला रुग्णाला दैनंदिन कामे करताना वेदना आणि त्रास होत होता. त्यानंतर बायोप्सी अहवालात ल्यूको सारकोमा नावाचा सौम्य कर्करोगाचे निदान झाले. स्नायूंच्या ऊतींमध्ये विकसित होणारा हा एक दुर्मिळ कर्करोग आहे. ही गाठ कॅन्सरची होती, पहिल्या टप्प्यातील कॅन्सर होता. ट्यूमर काढण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.

रुग्णावर डिसेंबर २०२२ मध्ये शस्त्रक्रिया होणार होती. आम्ही व्ही-वाय प्लास्टी तंत्राचा वापर केला. त्याच्या नितंबातून १४ सेमी लांबीचा एक वर्तुळ तयार करून ४ सेमी आकाराचा ट्यूमर काढण्यात आला. तो स्नायूमध्ये खोलवर रुजलेला नव्हता. ही शस्त्रक्रिया सुमारे ३ तास चालली आणि ३ दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
– डॉ. हेमंत पटेल, लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT