मुंबई

गरिबांच्या बर्गरला महागाईची झळ

CD

शुभांगी पाटील ः सकाळ वृत्तसेवा
तुर्भे, ता. ५ : भुकेच्या वेळी पोटाला आधार देणारा गरिबांचा बर्गर अर्थात वडापाव लवकरच महाग होणार आहे. कारण कच्चा माल महागल्याने बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईकडून पावाच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवरदेखील पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चटकदार खाण्याची आवड असलेल्यांसाठी वडापाव म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण सकाळी लवकर घराबाहेर पडणारे, हातावर काम असलेल्या चाकरमान्यांसाठी अनेकदा वडापावचाच आधार घ्यावा लागत आहे. अशातच नवी मुंबईमध्ये पावाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रविवारपासून नवी मुंबईमध्ये पावाचे भाव वाढले. कारण मैद्याचा भाव सध्या १८५० रुपये प्रतिपोते गेला असल्याने, तसेच पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले असल्याने पाव उत्पादनासह विक्री खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, पावाच्या प्रत्येक लादीमागे एक रुपया वाढवला असल्याची माहिती बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे चेअरमन अकबर शेख यांनी एका पत्रकार परिषदेमधून दिली आहे. त्यामुळे पावाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम वडापाव, तसेच पावभाजीच्या किमतीवरही पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
------------------------
बेकरी उत्पादक संकटात
मैद्याचे भाव वारंवार वाढत असल्याने बेकरी खाद्य उत्पादक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. यावर एकत्रित पर्याय शोधण्यासाठी झालेल्या बैठकीत बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईने पावाच्या किमतीत प्रतिलादी एक रुपया दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाव महागल्याने साधारणपणे १२ ते १५ रुपयांना मिळत असलेला वडापाव आता १८ ते २० रुपये किमतीने विकला जाण्याची शक्यता आहे. तसेच पावाशी निगडित असलेला समोसा, मिसळ पाव आणि पावभाजीदेखील महागण्याची शक्यता आहे.
---------------------------------
पावासाठीच्या मैद्याचे ५० किलोचे पोते २०२१ मध्ये १२०० ते १४०० रुपये होते. २०२२ मध्ये १६०० रुपयांच्या घरात गेले, तर २०२३ मध्ये हाच मैदा १८५० इतका वाढला आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे. यामुळे पावाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या खर्चात वाढ झाली आहे.
- अकबर शेख, चेअरमन, बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT