मुंबई

श्वास कोंडतोय भाग-८

CD

शौचालयांअभावी गोवंडीकरांचे आरोग्य धोक्यात

५०० कोटी खर्च करूनही १८८ पैकी ६४ शौचालये बंद

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगरसारख्या लोकवस्तीतील नागरिक आजही स्वच्छ पाणी, शौचालये आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिकेने गोवंडीत तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या शौचालयांची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील १८८ शौचालयांपैकी ६४ शौचालये बंद पडली आहे, तर ४१ टक्के शौचालयांना गळती लागल्याचे वास्तव ‘कोरो इंडिया - राईट टू पी’ या सामाजिक संस्थेने ‘सकाळ’कडे मांडले.

डम्पिंग ग्राऊंड आणि जैववैद्यकीय कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पामुळे गोवंडीतील नागरिकांना दमा, त्वचारोग, क्षयरोग, कर्करोगाचा सामना करावा लागत आहेत. एकीकडे येथील नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे स्वच्छ पाणी, शौचालये आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या परिसरात पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात अनेक ठिकाणी गटाराचे पाणी मिसळलेले असते. दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत या परिसरात सार्वजनिक शौचालयांची संख्या अतिशय कमी आहे आणि असलेल्या शौचालयांचीही नियमित स्वच्छता केली जात नाही आणि अनेकदा तर शौचालयांमध्ये पाणीही नसते. त्यामुळे सार्वजनिक शौचालये विविध आजारांना कारणीभूत ठरत आहेत; मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने एम-पूर्व विभागात २३४ शौचालये बांधली आहेत. यापैकी ‘कोरो इंडिया - राईट टू पी’ या संस्थेकडून १८८ शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. १८८ शौचालयांमध्ये तीन हजार ५८७ टॉयलेट सीट्स असून प्रत्येक सीटसाठी साधारणतः १.५ लाख रुपये खर्च केले आहे. त्यानुसार १८८ शौचालयासाठी ५३८ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च महापालिकेने केला आहे; परंतु सध्या या शौचालयांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
--------
आम्ही केलेल्या सर्वेक्षणात शौचालयांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झाले आहे. या शौचालयांच्या देखभालीसाठी वस्ती समिती तयार केली आहे; परंतु त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिलेले नाही. महापालिकेने शौचालये बांधण्यासाठी निधी दिला; परंतु शौचालयांच्या स्वच्छता आणि देखभालीसाठी निधी दिलेला नाही. त्यामुळे पालिकेने एम-पूर्वमधील शौचालयांकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.
- रोहिणी कदम, प्रकल्प संचालक, कोरो इंडिया-राईट टू पी
--
स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे; पण गोवंडीतील नागरिक या अधिकारापासून वंचित आहेत. रफीनगर, बाबानगरमधील लोकांना पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागते. अनेकदा पाणी उकळून प्यावे लागते. नुकतेच या भागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे लसीकरण पथक पुरेसे नाही. त्यात वाढ करणे गरजेचे आहे.
- शेख फैयाज आलम, सामाजिक कार्यकर्ते, गोवंडी
----
शौचालयांची दुरवस्था
एकूण शौचालये १८८
सुस्थितीतील शौचालये - १२४
बंद पडलेली शौचालये - ६४
-------

शौचालयांना समस्यांचा विळखा (टक्क्यांमध्ये)
गळती - ४१
पाण्याची समस्या - १७
वीजपुरवठा बंद - १७
सेप्टिक टॅंकमध्ये बिघाड - १३
मलवाहिनीमध्ये बिघाड - १२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT