मुंबई

वर्दळीच्या रस्त्यावर जीवघेणा खड्डा

CD

घणसोली, ता.६(बातमीदार)ः कोपरखैरणे सेक्टर २३ परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटचे झाकण नसल्याने भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच काही नागरिकांनी या खड्ड्यामध्ये कचरा टाकला असल्याने अस्वच्छता पसरली आहे.
नवी मुंबई शहरात नागरिकांच्या सोयीसाठी विविध नवनवीन योजना महापालिका राबवत आहे. मात्र मूलभूत आणि दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अशातच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पदपथांवर असलेली सिमेंटची झाकणे तुटलेल्या स्थितीत आहेत. तर रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या झाकणांची देखील हीच परिस्थिती असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, सायकल तसेच पादचाऱ्यांसाठी हे खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. तसेच या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
------------------------------------
कोपरखैरणे सेक्टर २३ परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटचे झाकण तुटलेले आहे. या खड्ड्याला नागरिकांनी कचऱ्याची कुंडी केली आहे. तसेच या खड्ड्यांमुळे रात्रीच्यावेळी अपघाताची शक्यता आहे.
-नितीन कदम, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT