मुंबई

कृषी सहसंचालकांची वनराई बंधाऱ्याची पाहणी

CD

पेण, ता. ८ (वार्ताहर) : तालुक्यातील रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अधिकचे पीक घेता यावे, यासाठी कृषी खात्याकडून गौवळणवाडीच्या परिसरात वनराई बंधारे बांधण्यात आले आहे. या बंधाऱ्यांची पाहणी नुकतीच कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केली. अलिबागचे उपविभागीय कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील शेती व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहेत. त्यामुळे या रब्बी हंगामात आधुनिक पद्धतीने शेतीसाठी श्रमदानातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे बांधण्यात आले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेण्यात येते. येथील शेतकऱ्यांनी उच्च लागवडीअंतर्गत नारळ, मूग, हरभरा, चवळी याची लागवड केली आहे. या कामाची प्रगती पाहून ठाण्याच्या कृषी सहसंचालकांनी शेतकऱ्यांचे व त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी वडगावमधील शेतकरी मधुकर म्हात्रे यांच्या स्मृती प्रोडक्टची, तर अंतोरे गावातील रोहिदास पाटील यांची ट्रॅक्टरची पाहणी केली. त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी कृष्णदेव सुरवसे, मंडळ कृषी अधिकारी स्नेहल पाटील, कृषी पर्यवेक्षक संभाजी पोटे, कृषी सहायक लांडगे, आनंद पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT